मुंबई सुधारण्याचा "राष्ट्रवादी'चा निर्धार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मुंबई -  "बस्स झाले आता... हवा बदल, हवा विकास', असे घोषवाक्‍य घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुधवारी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला.

मुंबई -  "बस्स झाले आता... हवा बदल, हवा विकास', असे घोषवाक्‍य घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुधवारी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला.

राष्ट्रवादी भवनात आज झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर व मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मुंबईकरांच्या मूलभूत तसेच शहराच्या विकासात्मक गरजांचा विचार करून पक्षातर्फे जाहीरनामा बनवण्यात आला आहे. याअंतर्गत मुंबईकरांसाठी आवश्‍यक सुविधा पुरविण्याबाबत जाहीरनाम्यात भर देण्यात आला असून, प्रत्येक मुंबईकराशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची बांधिलकी आहे आणि ती निभावण्यात येणार आहे, असा निर्धार सचिन अहिर यांनी व्यक्त केला. 

जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे : 
. प्रत्येक कुटुंबाला शुद्ध व स्वच्छ मोफत पाणी 
. पाणीपुरवठा तलावांची क्षमता वाढवणार 
. "बेस्ट'ची 100 मीटर युनिट मोफत वीज 
. "बेस्ट' बसचे भाडे पाच ते 20 रुपये 
. मुंबईकरांना आरोग्यविमा योजना 
. सर्व वार्डांत मोफत वाय-फाय 

Web Title: NCP determination to improve Mumbai