अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; समिती स्थापन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यस्तरीय शिस्तपालन समितीची स्थापना केली असून अध्यक्षपदी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची तर निमंत्रक पदी आमदार हेमंत टकले यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. ही समिती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्यांनी-ज्यांनी पक्षविरोधी काम केले आहे त्याबाबतचा आढावा घेवून कारवाई करण्याबाबत अहवाल देणार आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यस्तरीय शिस्तपालन समितीची स्थापना केली असून अध्यक्षपदी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची तर निमंत्रक पदी आमदार हेमंत टकले यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. ही समिती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्यांनी-ज्यांनी पक्षविरोधी काम केले आहे त्याबाबतचा आढावा घेवून कारवाई करण्याबाबत अहवाल देणार आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यामुळे पक्षाने हा निर्णय घेतल्याचीही चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात असल्याचे समजते. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर पक्षाची शिस्तपालन समिती निर्णय घेईल असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

या समितीमध्ये सदस्य म्हणून सुरेश घुले, श्रीमती उषाताई दराडे, डॉ. संतोषकुमार कोरपे, अमरसिंह पंडित, जयवंत जाधव, नसिम सिद्दीकी, विजय शिवणकर, हरिष सणस, रवींद्र पवार, रवींद्र तौर आदींचा समावेश आहे. नागपूर येथे 16 डिसेंबरपासून या महाविकास आघाडी सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. केवळ पाच दिवस हे अधिवेशन सुरू राहणार असून सहा मंत्र्यावरच कामकाज उरकण्याचा भार राहणार आहे.

काय घडलं बैठकीत? ज्यानंतर अजित पवारांनी बंड केलं

विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहात या सहा मंत्र्यानाच विरोधकांचा सामना करावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने त्यांच्या समोर विरोधी पक्षाचे आव्हान आहे. या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी 1978 ला पुलोद आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर केवळ चार मंत्र्यावरच हिवाळी अधिवेशन घेतले होते. त्यामुळे, दोन्ही सभागृहाचे कामकाज करण्यात या सहा मंत्र्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा केला जात आहे.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Establish state level disciplinary committee