Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या खांद्यावर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse News

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या खांद्यावर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी

राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी काॅग्रेसच्या परिषदेतील गटनेतेपदी खडसेंची निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या प्रतोतपदी अनिकेत तटकरेंची निवड करण्यात आली.(ncp hand over a big responsibility to eknath khadse )

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना याबाबतचे पत्रही देण्यात आले होते. एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आले आहे.

Maharashtra Budget Session : 'खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना विचारली जात', पवार संतप्त; मुनगंटीवारांनी दिले स्पष्टीकरण

खडसेंच्या माध्यमातून जळगावमध्ये राष्ट्रवादीला अधिक बळ मिळेल आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल असे पक्षाचे राजकीय गणित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय संघर्ष अनेकवेळा जळगावमध्ये पाहायला मिळतो. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादीने मोठी जबाबदारी दिली आहे.