Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hasan Mushrif ED Raid

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर तूर्तास कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने ईडीला दिले आहेत. (NCP Hasan Mushrif bombay High Court Hearing Ed )

उच्च न्यायालयाने 24 मार्च पर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या खांद्यावर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी

हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील निवासस्थानी आज ईडीचे पुन्हा छापेमारी सुरू आहे.

हसन मुश्रीफ यांच्यावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कारखान्यासाठी प्रलोभने दाखवून शेअर्स गोळा करत फसवणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Sharad Ponkshe: त्याने टोपी काढली तर मला जानवं काढावंच लागेल.. शरद पोंक्षे यांची व्हिडिओ 'ती' चर्चेत

या माध्यमातून हसन मुश्रीफ यांनी ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप विवेक कुलकर्णी यांनी केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मुरगुड पोलीस ठाण्यात हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले होते. मात्र, यापुढे कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. परंतु, आता हसन मुश्रीफ यांच्यावर प्रत्यक्षात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Hasan Mushrif