सरकारला खरीप आणि रब्बीतला फरकही कळत नाही: अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

हे सरकार खूप असंवेदनशील आहे. पुरात माणसांचे प्राण गेले, आणि यांचे मंत्री फोटो काढत फिरले. ही कसली टिंगलटवाळी चालली आहे? या सरकारला कसली मस्ती आहे? महाराष्ट्रावर आज भीषण संकट आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली, सातारा, कोल्हापूरात काम करत आहेत.

पैठण : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारने केलेली नाही. सरकारला रब्बी आणि खरीप यातील फरक नाही. हे सरकार प्रचंड असंवेदनशील आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून (सोमवार) पैठण येथून सुरवात झाली. बाळानगर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने ही यात्रा सुरु केली आहे.

अजित पवार म्हणाले, की हे सरकार खूप असंवेदनशील आहे. पुरात माणसांचे प्राण गेले, आणि यांचे मंत्री फोटो काढत फिरले. ही कसली टिंगलटवाळी चालली आहे? या सरकारला कसली मस्ती आहे? महाराष्ट्रावर आज भीषण संकट आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली, सातारा, कोल्हापूरात काम करत आहेत. आम्हीही शक्यतोपरी मदत करत आहोत. विस्कटलेले संसार उभे करण्याचा प्रयत्न करत आहोत. अडचणीत असलेल्या माणसाला आपल्याला मदत करायची आहे मतपरिवर्तनातून समाजपरिवर्तन हा संदेश संत एकनाथ महाराजांनी दिला होता. राज्यात सुराज्य आणण्यासाठी आता सरकारविरोधातील रागाचे मतांमध्ये परिवर्तन करून आपल्याला समाजपरिवर्तन करावे लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar criticize government on farmer loan waiver