
Ajit Pawar: 'तुम्हाला शंका फार...', जयंत पाटलांना फोन का केला नाही याचं अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची IF & LS कंपनी घोटाळा प्रकरणी ईडीकडून काल तब्बल नऊ तास इडीने चौकशी केली. त्यांच्या चौकशीनंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले पण विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा फोन त्यांना आला नाही. त्यावर आता राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीची चर्चा अधिक रंगली आहे
त्यावर पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न केला असता पवार म्हणाले की,'ज्या वेळी पासून आम्ही सत्तेत आहे, कुठल्या व्यक्तीच्या संदर्भात मी वक्तव्य केलं आहे. जयंत पाटील यांना एकट्यालाच ईडीने चौकशीसाठी बोलावलं नाही. याआधी त्यांनी छगन भुजबळ यांना बोलावलं होतं. त्यावेळी मी काही वक्तव्य केलं असेल तर मला दाखवा. अनिल देशमुख यांना देखील बोलावलं होतं. त्यावेळी मी काही वक्तव्य केलं असेल तर ते दाखवा. प्रफुल्ल पटेल यांच्यावेळी मी काही बोललो असेल तर दाखवा. तुम्ही जाणिवपुर्वक काही वेगळे अर्थ काढण्याचा प्रयत्न करता असं अजित पवार म्हणाले आहेत.
तर पुढे बोलताना ते म्हणाले कि, मी आतापर्यंत कोणाच्याही बाबतीत कोणतंही वक्तव्य करत नाही. माझ्याही बाबतीत आयकर विभागाने २२ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळी काय बोलायचं ते मी बोललो होतो. त्यानंतर पुन्हा मी माझ्या कामाला लागलो असंही पुढे अजित पवार म्हणालेत.
तपास यंत्रणांना चौकशीचा अधिकार आहे. भाजपमध्ये गेल्यांची चौकशी होत नाही. सूडभावनेतून चौकशीला बोलवणं चुकीचं. मी कोणत्याही नेत्याच्या चौकशीवर प्रतिक्रिया देत नाही. भुजबळ आणि मलिक यांच्या प्रकरणावरही मी बोललो नाही. तर फोन कशाला जेव्हा मी त्यांना भेटेन तेव्हा मी त्यांना बोलेन असंही अजित पवार म्हणाले
ईडीच्या चौकशीनंतर जयंत पाटील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले. दरम्यान, त्यांनी भेटीपूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ईडीच्या चौकशीनंतर कुणाकुणाचा फोन आला, अजितदादांचा आला होता का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी 'नाही, मला त्यांच्या फोन नाही आला.' असं स्पष्टपणे जयंत पाटील यांनी सांगितलं. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीची चर्चांना उत आला आहे.
ईडीच्या चौकशीनंतर जयंत पाटील काय म्हणाले?
IF & LS कंपनीबाबत मला माहिती नाही. मी दिलेल्या उत्तराने त्यांचे समाधान झाले असेल. मी चौकशीला पूर्ण सहकार्य केले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनीदेखील चांगली वागणूक दिली. त्यामुळे त्यांच्याबद्दल उगाच तक्रार करणार नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.