उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय शरद पवारच घेतील : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादीकडून फक्त जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोघेच मंत्री म्हणून शपथ घेतील. जयंत पाटील यांनी आपण मंत्रीपदाचे शपथ घेत असल्याचे सांगत मंत्री म्हणून शपथ घेत असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय पवारसाहेब घेतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय शरद पवारच घेतील; अजून निर्णय झालेला नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.

चार दिवसांपूर्वी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार राजीनामा दिल्यानंतर पक्षात परतल्याने आता ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री होणार या चर्चांना सुरवात झाली होती. पण, राष्ट्रवादीने याबाबत स्पष्टीकरण देत अजित पवार हे आज शपथ घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीकडून फक्त जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोघेच मंत्री म्हणून शपथ घेतील. जयंत पाटील यांनी आपण मंत्रीपदाचे शपथ घेत असल्याचे सांगत मंत्री म्हणून शपथ घेत असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय पवारसाहेब घेतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाविकास आघाडीचे नेते व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मंत्रिपदांच्या वाटपाचेही सूत्र ठरले असून, त्यानुसार उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसला, तर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात येणार आहे. शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, राज्यभरातून एक लाख शिवसैनिक येणार आहेत. शिवाय, देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलाविण्यात आले आहे.

राज्यात आजपासून उद्धव सरकार 

अजित पवारांच्या नाराजीची पुन्हा अफवा; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

शपथविधी सोहळ्यासाठी नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचं निमंत्रण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar may be next DY CM in Maharashtra government