Ajit Pawar: एवढ्या निवडणुका पाहिल्या पण मुख्यमंत्र्यांना 'असं' करावं लागलं नव्हतं; पवार स्पष्ट बोलले

NCP Ajit Pawar
NCP Ajit Pawar sakal

पुणेः कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. आजपासून जाहीर प्रचार थांबला असून २६ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. यावेळी अजित पवार यांनी या निवडणुकांतील प्रचाराविषयी भाष्य केलं.

अजित पवार बोलतांना म्हणाले की, आजपर्यंत एवढ्या निवडणुका झाल्या परंतु मुख्यमंत्र्यांना रोड-शोमध्ये उतरावं लागल्याचं पहिल्यांदाच बघितलं. यावरुनच ही निवडणूक कोण जिंकेल, ते ध्यानात येतंय. चिंचवडमध्ये नाना काटे आणि कसब्यात रवींद्र धंगेकर यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचं पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले की, ही पोटनिवडणूक आता एकतर्फी राहिलेली नाही. चुरशीची लढत झाली आहे. त्यामुळे आम्हांला दोन्ही ठिकाणी यश मिळेल, यात शंका नाही. भाजपचे नेते ज्या पद्धतीने प्रचारात उतरले त्यावरुनच त्यांनी किती धसका घेतलाय, हे स्पष्ट असल्याचं पवार म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील दोन-तीन दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी तर मध्यरात्री भेटीगाठी घेऊन प्रचार केला. त्यामुळे या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com