कोण माईका लाल फुटतो, असे म्हणणारे अजित पवारच फुटले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या घोळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटणार असे वृत्त आल्यानंतर कोण माईका लाल फुटतोय असे म्हणणारे अजित पवार आज (शनिवार) फुटल्याचे दिसत आहेत.

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या घोळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटणार असे वृत्त आल्यानंतर कोण माईका लाल फुटतोय असे म्हणणारे अजित पवार आज (शनिवार) फुटल्याचे दिसत आहेत. अजित पवार यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

क्लिक करा आणि सकाळचे एप डाऊनलोड करा

राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. यावरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

अजित पवारांनी राष्ट्रवादीचे काही आमदार आपल्यासोबत असल्याचे सांगितले असले तरी शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना आणले. त्यामुळे अजित पवारांसोबत नक्की किती आमदार आहेत, हे सांगणे सध्यातरी कठीण आहे. नुकतीच राष्ट्रवादीची बैठक झाल्यानंतर आमदार फोडणाऱ्यांविरोधात कडक वक्तव्य केले होते. अजित पवार म्हणाले होते, की कोण माईका लाल आमचे आमदार फोडतो, ते पाहतोच. तसेच फुटलेल्या आमदाराविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र उमेदवार देऊन त्याचा पराभव करू असे म्हटले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar quits the party