संग्रामला मी जवळून ओळखतो, तो निष्पाप!: अजित पवार

Ajit Pawar
Ajit Pawar

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली असून, कायद्यापेक्षा कुणीच मोठे नाही. ज्यांनी हत्या केली ते शरण गेले आहेत. परंतु असे वातावरण तयार करण्यात आले की राष्ट्रवादीचा आमदार त्यात आहे. संग्रामला मी जवळून ओळखतो, तो निष्पाप आहे तरी त्याला त्यात अटक करण्यात आली. त्याला जाणीवपूर्वक अटक करण्यात आली असून, आमच्या आमदाराला गोवण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

नगरमधील हत्याकांडप्रकऱणी नगरचे आमदार संग्राम जगताप यांना रविवारी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात त्यांचे सासरे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनाही अटक झाली आहे. नगरमध्ये पोटनिवडणुकीच्या वादातून दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. यावरून नगरमध्ये राजकारण पेटले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

अजित पवार म्हणाले, ''पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केला, ही गोष्ट चुकीची आहे. महाराष्ट्राला शोभणारी नाही. या पाठिमागाचा मास्टर माईंड शोधा, पोलिसांचे फोन तपासा यात संग्राम जगताप निर्दोष असेल. आमच्या आमदाराला गोवण्यात आले आहे. त्याच नाव जाणीवपूर्वक घेण्यात आले आहे. ज्यांनी हे केले आहे त्यांना फाशीची शिक्षा द्या. एसपी कार्यालयावर हल्ला करणारे बाहेरचे असून, विघ्नसंतोषी लोक आहेत.''

याबरोबरच सरकारवर हल्लाबोल करताना अजित पवार म्हणाले, की कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हल्लाबोल आंदोलन सुरु राहील. शिवसेना डबल गेम खेळत आहे. सेना कॅबिनेटमध्ये कोणत्याही निर्णयाला विरोध करत नाही, त्यांच्या नेत्यांना कोणती गोष्ट आवडली नाही तर बाहेर येउन विरोध करतात. आम्हाला जे जे प्रश्न विचारले त्याची आम्ही उत्तरे दिलेली आहेत. आम्हालाही संशयाच्या भोवऱ्यात राहणे योग्य वाटत नाही. मात्र चंद्रकांतदादा सत्तेवर आहेत त्यांनी काय बोलाव हे त्यांच्यावर आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com