घटनात्मक आरक्षण देण्यासाठी विरोधकांचा पाठिंबा : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

दुष्काळ-दुष्काळाच्या संदर्भात 50 हजार हेक्टरी मदत जाहीर करा. फळबागांना प्रति हेक्टरी 1 लाखांची मदत तात्काळ जाहीर करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना 52% आरक्षणाला धक्का लागू नये. घटनात्मक आरक्षण देण्यासाठी आम्ही सर्व विरोधक सहकार्य करतील याची मी शाश्वती देतो, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज (मंगळवार) दुसऱ्या दिवशी आरक्षणावरून बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. त्यापूर्वी आज दुसऱ्या दिवशीही आरक्षण, दुष्काळ, महागाई अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली. 

अजित पवार म्हणाले, ''मागासवर्ग आयोगाने काय अहवाल दिला आहे, हा सभागृहात मांडावा. आरक्षण देताना आम्ही एकमताने निर्णय घेऊ. 52 टक्क्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या. मराठ्यांबरोबर धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचे काय झाले. घटनात्मक पेच निर्माण असेल तर अहवाल अणूच नका. आम्ही अधिवेशन वाढवून घेण्याची मागणी राज्यपालांकडे केली त्याला अध्यक्ष म्हणून तुम्ही सुद्धा सहमती द्यावी. धनगर आरक्षण संदर्भात टिसने दिलेला अहवाल दिल्लीला न पाठवता पटलावर द्यावा. मुस्लिम समाजाला जे उच्च न्यायालयाने 5% आरक्षण दिल आहे, ते त्यांना द्यायला हवे. आमच्या वेळी घेतलेले निर्णय न्यायालयात टिकले नाहीत. मराठा समाजाला आरक्षण देताना ते घटनात्मक आणि कायद्याच्या चौकटीत द्या.'' 

दुष्काळ-दुष्काळाच्या संदर्भात 50 हजार हेक्टरी मदत जाहीर करा. फळबागांना प्रति हेक्टरी 1 लाखांची मदत तात्काळ जाहीर करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पटलावर मांडा. शिवसेना मराठा आरक्षण मुद्द्यावर गप्प आहे. शिवसेनेचे अध्यक्ष अयोध्येला निघाले आहेत. तातडीने 50 हजार हेक्टरी मदत जाहीर करावी. फळबागांना हेक्टरी 1 लाखांची मदत जाहीर करा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Web Title: NCP leader Ajit Pawar talked about Maratha Reservation report