अजित पवारांचा भाजपच्या बड्या नेत्यासोबत विमानप्रवास; चर्चांना उधाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी सर्वच राजकीय नेते नागपुरात दाखल झाले आहेत. रविवारी (ता.15) मुंबईहून अनेक नेते नागपुरात दाखल झाले.

मुंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार सत्तेवर आलं आहे. पण, अजूनही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीच्या शॉकमधून महाराष्ट्र बाहेर पडलेला नाही. त्यामुळंच अजित पवार कोणत्याही भाजप नेत्यासोबत दिसले तरी राजकीय चर्चेला उधाण येतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

काय घडलं नागपूर विमानतळावर?

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी सर्वच राजकीय नेते नागपुरात दाखल झाले आहेत. रविवारी (ता.15) मुंबईहून अनेक नेते नागपुरात दाखल झाले. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एका विमानातून उतरल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या.

- कविता सत्तेची गुलाम नसते : डॉ. कुमार विश्वास

विमानतळावर उपस्थित मीडियाच्या प्रतिनिधिंमध्येही यावरून चर्चा सुरू झाली. शिवसेनेच्या मुखपत्रात भाजपच्या आशा केवळ अजित पवार यांच्यावर अवलंबून असल्याचं म्हटल्यामुळं अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या विमानप्रवासाची वेगळीच चर्चा नागपुरात रंगली आहे. दरम्यान, याच विमानात राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटीलदेखील होते, अशी माहिती मिळाली आहे. 

- चेन्नईतील फातिमाच्या आत्महत्येचा तपास आता सीबीआयकडे

तेव्हाही झाली होती चर्चा  

अजित पवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी एकाच व्यासपीठावर आले होते. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात अजित पवार आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर होते. त्यावेळीही राजकीय चर्चांना उधाण आले होते.

- नाट्यसंमेलनाध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेलच; पण एकमतासाठी लागले पाच तास!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar traveled by plane with BJP leader