
Ajit Pawar: पक्षातील नेत्यांसदर्भात पवारांचे मोठं वक्तव्य; बड्या नेत्यांच टेन्शन वाढलं
आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातुन सर्व पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच अजित पवार यांनी विधानसभेच्या जागा वाटपाबाबत माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. पवारांच्या या वक्तव्यामुळे विधानसभा इच्छूकांची धाकधूक आणखी वाढली आहे.(Latest Marathi News)
अजित पवार बोलताना म्हणाले कि, 'वरिष्ट नेत्यांनी लोकसभेत जावं असा काही निर्णय अजुन झालेला नाही. आम्ही सध्या अंदाज घेत आहोत. सध्या आमचं लोकसभा निवडणुकीकडं लक्ष आहे. जो लोकसभा निवडणुकीत चांगलं काम करेल अशाच लोकांचा विधानसभेच्या तिकीटासाठी विचार होईल असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.(Latest Marathi News)
नाना पटोले यांच्या भावी मुख्यमंत्री पोस्टरवर प्रतिक्रीया
भावी मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लागले म्हणून कोणाला त्रास व्हायचं काही कारण नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो म्हणून ते पोस्टर लावत असतात. मात्र मुख्यमंत्री असंच होता येत नाही. त्यासाठी पक्षाकडे 145 चा आकडा लागतो. ज्या पक्षाकडे हा आकडा असेल त्यांचा मुख्यमंत्री होतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.(Latest Marathi News)
संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रीया
संजय राऊत मोठे नेते आहेत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. जर माझंच काही म्हणणं नसेल तर तुम्ही का मनावर घेता, असं अजित पवार म्हणालेत.(Latest Marathi News)