
Pankaja Munde: पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार? अनिल देशमुखांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मला कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईन. कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही, मी भाजपची पण भाजप माझी थोडीच आहे अशी सूचक विधानं पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवली आहेत. (Latest Marathi News)
पंकजा यांच्या विधानांमुळे त्या पक्षात नाराज असल्याच्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. पंकजा मुंडे काही वेगळा निर्णय घेण्याचा विचार तर नाही ना? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातर राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या राष्ट्रवादीत जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा दावा केला आहे.(Latest Marathi News)
काय म्हणाले अनिल देशमुख?
'पंकजा मुंडे काय बोलल्या तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. पंकजा यांनी जर राष्ट्रवादीत येण्याचा विचार केला तर त्यावर नक्की विचार केला जाईल. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि बीड जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार याबाबत निर्णय घेतील. प्रस्ताव असेल तर बीडमधील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पण असं काही माझ्या कानावर आलेलं नाही, असंही अनिल देशमुख म्हणाले आहेत. देशमुख यांच्या वक्तव्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.(Latest Marathi News)
तर शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्याने भावी खासदार अशी बॅनरबाजी सुरू केली आहे. त्यामुळे शिरूरमधून अमोल कोल्हे यांच काय आहे. त्यावरही अनिल देशमुख यांनी भाष्य केलं आहे. अमोल कोल्हे राष्ट्रवादीत आहे आणि राष्ट्रवादीतच राहणार आहेत, असं देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.(Latest Marathi News)