esakal | बाळासाहेबांची आठवण येत नाही, असा एकही दिवस नाही : भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Chagan Bhujbal

शिवसेनेच्या लढाईत मी बाळासाहेबांसोबत असायचो. शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी सगळे जण मिळून बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, यात नक्की यश येईल. 

बाळासाहेबांची आठवण येत नाही, असा एकही दिवस नाही : भुजबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दिवसातून एकदातरी आठवण होते. त्यांची आठवण येत नाही असा एकही दिवस नाही. 25 वर्षे मी त्यांच्यासोबत होते, अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना झाली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवारी) स्मृतिदिन असून, शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना अभिवादन केले. यानिमित्ताने त्यांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो शिवसैनिकांची गर्दी शिवतीर्थावर उसळली आहे.

युती केली चूक झाली : रावसाहेब दानवे

भुजबळ म्हणाले, की शिवसेनेच्या लढाईत मी बाळासाहेबांसोबत असायचो. शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी सगळे जण मिळून बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, यात नक्की यश येईल. 

बाळासाहेबांना अभिवादन करताना फडणवीस म्हणतात, स्वाभिमान जपा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नमन करण्यासाठी आज हजारो नागरिक शिवाजी पार्कवर जमत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी रंगरंगोटी आणि इतर व्यवस्था केली आहे. आज या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. पदाधिकारी आणि आमदारांसाठी एक वेगळा गेट असणार आहे. याचबरोबर मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकदेखील या ठिकाणी येणार असल्याने त्यांच्यासाठी दोन वेगळ्या गेटची सुविधा करण्यात आली आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच सरकार स्थापन करणार आहे. अशात आज शिवसेनेव्यतिरिक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक मोठे नेते हे शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस नमन करण्यास येण्याची शक्‍यता आहे.