esakal | 'राज ठाकरेंचं स्वप्नही उद्धव ठाकरेंनी पूर्ण केलं' 
sakal

बोलून बातमी शोधा

ncp leader chhagan bhujbal congratulates devendra fadnavis in assembly1ncp leader chhagan bhujbal congratulates devendra fadnavis in assembly

'राज ठाकरेंचं स्वप्नही उद्धव ठाकरेंनी पूर्ण केलं' 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला सक्षम विरोधीपक्षाची गरज असल्याचं म्हटलं होतं. त्यांना सक्षम विरोधीपक्ष द्यायचा होता. राज ठाकरे यांचं स्वप्न त्यांचे बंधू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केलं, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लगावला आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते म्हणून, आज देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. त्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना, छगन भुजबळ यांनी सभागृहात जोरदार टोलेबाजी केली. 

डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

काय म्हणाले भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांची स्वप्नं पूर्ण केली. शिवसेना मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. त्याचवेळी राज ठाकरे यांचं सक्षम विरोधी पक्षा देण्याचं स्वप्न त्यांनी तुमच्या रुपानं पूर्ण केलंय. तेव्हा तुम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून, चांगलं काम कराल अशी अपेक्षा आहे. राज्याच्या जनतेला आपलं मत कोण मांडणार? हे हवं असतं. त्यामुळं त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा. तुम्ही पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणत आलात आणि विरोधीपक्षनेते झालात. तुमचं अभिनंदन. आता पाच वर्षे हे सरकार नीट चालावं, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी रात्रीचे खेळ बंद करा.' 

आणखी वाचा - फडणवीसांविरोधात विधानसभेत उद्धव ठाकरेंची बॅटिंग

आणखी वाचा - अजित पवारांकडे आता हे मंत्रिपद?

चंद्रकांतदादा समोरच्याचं ऐकून घ्या'
भुजबळ यांच्या रात्रीचे खेळ या वक्तव्यावरून भाजप नेत्यांना मिरच्या झोंबल्या. त्यांनी भुजबळ यांना, 'तुम्हाला अजून भीती वाटते का?' असा प्रश्न उपस्थित केला. चंद्रकांत पाटील यांनी भुजबळसाहेब तुमचा आवाज वाढलाय, असा टोला लगावला. त्यावर भुजबळ म्हणाले, मी कोणत्याही सभागृहात बोललो तर, माझा आवाज असाच असतो. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही आधी केलाय. त्याविषयी मला काही तक्रार नाही. पण, यापुढे तुम्ही ही तोंड उघडे ठेवा. कान उघडे ठेवा, समोरची व्यक्ती काय बोलतेय, सांगतेय, याकडे लक्ष द्या.'

loading image
go to top