सत्तेचा माज असलेल्या सरकारला उलथून टाका : भुजबळ

mahad.jpg
mahad.jpg

महाड : 'शिका संघटित व्हा, असा नारा देण्याऱ्या शाहू फूले आंबेडकरांच्या देशात मनुवाद पुन्हा उफाळून येत आहे. जातीय-धार्मिक तेढ वाढतेय, कायद्याचा पत्ता नाही, आम्ही करु ती पूर्व दिशा असा कारभार सुरु आहे. माध्यमं व अभिव्यक्ती स्वातंत्र्यही धोक्यात आहे. सत्तेचा असा माज असलेल्या या सरकारला उलथून टाका', असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

रायगड किल्ल्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनाचा यात्रेला सुरवात झाली. यानिमित्ताने महाड येथे आयोजित जाहीर सभेत छगन भुजबळ बोलत होते. नरेद्र मोदी व गडकरींच्या नकला, शेरोशायरी व किस्से सांगत छगन भुजबळ यांनी महाड येथे आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रसच्या परिवर्तन यात्रेत रंगत आणली. कार्यक्रमाला राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, गणेश नाईक, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, नवाब मलिक उपस्थित होते.

सुनील तटकरे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी रायगड मतदार संघातून या यात्रेला सुरवात झाली. भुजबळांनी मोदींची मनसोक्त नक्कल केली तर, शेरोशायरी व विनोदी भाषणही केले. आम आदमीसमोर 'मन की बात' करणारे उद्योगपतींबरोबर 'धन की बात' करतात. यांची डिग्री फेल, धंदा फेल संगळे फेल असलेले राफेलपर्यंत पोचल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या अंबानीने खेळण्यातले विमानही बनवलेले नाही. त्याला राफेलची ऑर्डर कशी मिळते, असा सवालही त्यांनी केला.

सर्व यंत्रणा विरोधकांच्या विरोधात वापरल्या जात आहेत. दडपशाहीने सर्वांचे आवाज दाबले जात आहेत. विकासविरुध्द काँग्रेस अशी घोषणा करणारे मोदी विकास नसल्याने असा जनता विरुध्द काँग्रेस असा प्रचार करत आहे. शिवसेनेलाही त्यांनी आपण सत्तेच्या पापात भागीदार असल्याचा टोला लगावला. अजित पवार यांनी राज्यघटनेचा सन्मान केले जात नाही. महागाई कमी होत नाही तर शेतकऱ्याला किंमत दिली जात नाही, अशा सरकारला हटवण्यासाठी ही निर्धार यात्रा असल्याचे सांगितले.

जयंत पाटील यांनी युती गेली खड्डयात म्हणणारे उद्धव ठाकरे सॅाफिटेल हॅाटेलमध्ये मुख्यमंत्र्यासह मध्यरात्री बैठक करत असल्याचा गौप्यस्फोट केला. तर सुनील तटकरे यांनी मंत्री अनंत गीते यांच्यावर तोफ डागली. ऊर्जा व अवजड उद्योग अशी खाती मिळूनही जिल्ह्यात गीते एकही उद्योग आणू शकले नाहीत. त्यामुळे आता परिवर्तनाची गरज असल्याचे सांगितले.

दरम्यान, धनंजय मुंडे व सर्व नेत्यांनी महागाई, गॅस दरवाढ, तरुणांना रोजगार, शेतकरी कर्जमाफी, सवर्णांना दिलेले आरक्षण, सेना भाजप साटेलोटे, नोटाबंदी अशा विविध मुद्यांवर आपले विचार मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com