धनंजय मुंडेंचा; पंकजा मुंडेंवर 65 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मार्च 2019

महिला व बालकल्याण खाते मोबाईल प्रकरण
एकुण जिल्हे - 30
अंगणवाडी संख्या - 85 हजार 452
मोबाईलची बाजारातील किंमत- 6 हजार 999 रुपये
खरेदी केलेली किंमत - 8 हजार 777 रुपये
30 ते 40 कोटींमध्ये येणाऱ्या फोनसाठी 106 कोटी.

मुंबई : राज्याच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे 30 जिल्ह्यांमधील अंगणवाडी केंद्रांसाठी खरेदी करण्यात आलेल्या मोबाईल खरेदीमध्ये 65 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. असा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. पंकजा मुंडे या महिला व बालल्याण खात्याच्या मंत्री आहे.

अंगणवाडी केंद्रामध्ये रियल - टाइम मॉनिटरींगसाठी मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्याकडून घेण्यात आला होता. त्यानुसार बंगळुरु येथील 'एम एस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा.लि.' या कंपनीकडून 'पॅनासोनिक इलुगा I7' हा मोबाईल फोन खरदी करण्यात येणार आहे. बाजारात ६ हजार ९९९ रुपयांना मिळणारा मोबाईल ८ हजार ७७७ रुपयांना खरेदी करण्यात आला असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी महिला बालकल्याण खात्यावर केला आहे. या मोबाईल खरेदीमध्ये घोटाळा असून या प्रकरणाची चौकशी करावी. यातून नक्की कोणाचा फायदा करायचा होता हे समोर येईल.

धनंजय मुंडे म्हणाले, वर्षभरापूर्वीही मोबाईल खरेदीचा करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी 1 लाख 20 हजार 335 मोबाईल 46 कोटीं खरेदी करण्याचे ठरले होते. परंतु, यावर व्यक्त केल्याने ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा 40 कोटींच्या मोबाईल खरेदीसाठी तब्बल 106 कोटी रुपये खर्च करण्याचे काम सुरु आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर जाणीवपुर्वक हा निर्णय घेण्याचा प्रकार सुरु आहे. आम्ही अनेक घोटाळे बाहेर काढत आहोत परंतु, मुख्यमंत्री यातील एकाही घोटाळ्यात चौकशी करत नाहीत. भ्रष्ट्राचारी मंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे.

महिला व बालकल्याण खाते मोबाईल प्रकरण
एकुण जिल्हे - 30
अंगणवाडी संख्या - 85 हजार 452
मोबाईलची बाजारातील किंमत- 6 हजार 999 रुपये
खरेदी केलेली किंमत - 8 हजार 777 रुपये
30 ते 40 कोटींमध्ये येणाऱ्या फोनसाठी 106 कोटी.

Web Title: ncp leader dhananjay munde alleges pankaja mundes department for Mobile scam