'बाजी पलटने में देर नहीं लगती' : धनंजय मुंडे

Dhananjay_Munde
Dhananjay_Munde

मुंबई : सरकारं येत असतात आणि जात असतात; पण "बाजी पलटने में देर नहीं लगती,'' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत विरोधी पक्षांतील नेत्यांच्या प्रवेशाचा धडाका सुरू असून, या फोडाफोडीच्या राजकारणावर धनजंय मुंडेंनी जोरदार टीका केली. 

धनंजय मुंडे म्हणाले की, सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडण्याची एक अनिष्ठ राजकीय परंपरा महाराष्ट्रात भाजप- सेनेच्या सरकारने सुरू केली आहे. भाजप- सेनेच्या कारकिर्दीत अनेक गंभीर भ्रष्ट्राचाराची प्रकरणे घडली आहेत. आघाडी सरकार आल्यास या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्यासाठी आम्हाला सत्तेचा गैरवापर करण्याचीही गरज राहणार नाही. परिस्थिती अशी होईल, की त्या भ्रष्ट नेत्यांना एक दिवसही स्वपक्षात राहणे अवघड होऊन जाईल. सरकारं येत असतात, जात असतात, "बाजी पलटने में देर नहीं लगती," असा खोचक टोला त्यांनी भाजप-शिवसेनेला लगावला. 

पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसलाच बसत असून, पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चिंता वाढली आहे. राष्ट्रवादीतील 20 नेत्यांनी पक्षांतर केले, तर काहीजण अजूनही वेटिंगवर आहेत. महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्षाला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com