भाजप-शिवसेनेने करून नाही, तर भरून दाखवले : धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

मुंबईत अनेक ठिकाणी भिंती कोसळण्याच्या, रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. मुंबईतील पुल, रस्ते, इतर बांधकामांचे ऑडिट व्हायला हवे, अशी आमची मागणी आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना निवडणुकांमधून वेळ मिळेल तर हे शक्य होईल, असे मुंडे म्हणाले.

मुंबई : कितीही पाऊस आला तरी मुंबई तुंबणार नाही अशा वल्गना सत्ताधारी भाजप-शिवसेना करत होते. मात्र पाऊस पडला आणि मुंबापुरीची तुंबापुरी झाली. खरंतर यांनी 'करून' दाखवले, मुंबईला 'भरून' दाखवले, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली.

मुंबई शहर व उपनगराला सोमवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तर, मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा पूर्णपण विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी भिंती कोसळण्याच्या, रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. मुंबईतील पुल, रस्ते, इतर बांधकामांचे ऑडिट व्हायला हवे, अशी आमची मागणी आहे. मात्र सत्ताधाऱ्यांना निवडणुकांमधून वेळ मिळेल तर हे शक्य होईल, असे मुंडे म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Dhananjay Munde attacks Shivsena BJP on water logging in Mumbai