फडणवीस सरकार ब्रिटीश मनोवृत्तीचे : धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा नको म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या वयोवृध्द पत्नी आणि मुलाला अटक करणे म्हणजे तर फडणवीस सरकारची ब्रिटीश मनोवृत्ती दाखवून देते. सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध.' असे ट्विट मुंडे यांनी केले आहे. 

पुणे : राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार ब्रिटीश मनोवृत्तीचे आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबाला स्थानबद्ध करण्यात आल्याने मुंडे यांना सरकारला लक्ष्य केले आहे. सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध करत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी ही टिका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी धुळे दौरा केला. मंत्रालयात विष प्राशन करुन आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई आणि मुलगा नरेंद्र पाटील यांना दोंडाईचा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दोंडाईचा परिसरातून मुख्यमंत्री निघून गेल्यानंतर सखुबाई आणि नरेंद्र पाटील यांना सोडण्यात आले. परंतू नरेंद्र यांनी पोलिस स्टेशनमधून जाण्यास नकार दिला.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा नको म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या वयोवृध्द पत्नी आणि मुलाला अटक करणे म्हणजे तर फडणवीस सरकारची ब्रिटीश मनोवृत्ती दाखवून देते. सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध.' असे ट्विट मुंडे यांनी केले आहे. 

२४ डिसेंबरलाच दोंडाईचा पोलिसांना मी पत्र लिहून 'मुख्यमंत्री दौऱ्यात आपण कोणताही गैरकायदेशीर मार्ग किंवा आंदोलनाचा अवलंब करणार नाही,' असे सांगितले होते. तरीही मला आणि माझ्या आईला सकाळी सहापासून पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवले होते. आता कोणताही मंत्री गावात आला तर माझ्या कुटुंबाला असाच त्रास दिला जाणार आहे का? असा प्रश्नही नरेंद्र यांनी केला.

Web Title: NCP leader Dhananjay Munde criticize state government on Dharma Patil