'मोदींची भाषणं ऐकली की गजनी आठवतो'

'मोदींची भाषणं ऐकली की गजनी आठवतो'

मुंबई : नरेंद्र मोदींची 2014 सालच्या निवडणुकांपूर्वीची भाषणं आणि आताची भाषणं ऐकली की मला गजनी चित्रपटातील आमीर खानची आठवण येते, अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरवरून निशाणा साधला. तसेच मोदींनाही त्यांनी दिलेल्या असंख्य आश्वासनांचा विसर पडला आहे. इथे विक्रमगडच्या चौकाचौकातही मोदींच्या 'अच्छे दिन'ची चेष्टा होत असेल, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला विविध आश्वासने दिली होती. या आश्वासनांच्या पूर्ततेवरून धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, 2014 मध्ये निवडणुकांपूर्वी मोदींनी केलेली भाषणं आणि आताची भाषणं ऐकली की मला गजनी चित्रपटातील आमीर खानची आठवण येते. मोदींनाही त्यांनी दिलेल्या असंख्य आश्वासनांचा विसर पडला आहे. 2014 सालच्या लाटेत देशाचे, राज्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, आता यांची वाट लावल्याशिवाय जनता शांत बसणार नाही. 

''भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या समारोपाप्रसंगी मोदी म्हणाले, की आम्हाला गर्व आहे की आम्ही भ्रष्टाचारमुक्त शासन दिले. मग व्यापम, ललित गेट, राफेल काय आहे? महाराष्ट्रातील मंत्र्यांनी तर जनतेला कोट्यवधी रुपयांनी लुटले. हे तर तुमचं भ्रष्टाचारयुक्त शासन'', असे मुंडे म्हणाले.

दरम्यान, मोदींच्या भक्तांनी जर मोदींना त्यांचीच 2014 सालची भाषणं ऐकवली तर मोदी स्वतःच प्रचारासाठी बाहेर पडणार नाहीत, असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com