सरकारने शेतकऱ्यांचा बाजार मांडला : धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

शेतकरी दुध काढतो, त्याचे पोट खपाटीला गेले अन् दुध पिणारे गब्बर झाले अशी भाषणे सदाभाऊ खोत यांनी पुण्याच्या सभेत केली होती. त्याची आठवण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी करुन दिली.

नागपूर : राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दु:खावर आणि त्यांच्या भावनांवर आम्हाला सभागृहात बोलायचे आहे. आमदार सुनिल तटकरे यांनी मांडलेल्या 289 प्रस्तावावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

शेतकरी दुध काढतो, त्याचे पोट खपाटीला गेले अन् दुध पिणारे गब्बर झाले अशी भाषणे सदाभाऊ खोत यांनी पुण्याच्या सभेत केली होती. त्याची आठवण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी करुन दिली.

शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दल राग आहे, सरकार बैठका घेत आहे पण शेतक-यांना हे मान्य नाही, किती दिवस शेतकऱ्यांचा बाजार मांडणार आहेत असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत उत्तर देण्यासाठी उभे राहिले असतानाच सभागृहात ‘भाव दया,भाव दया सदाभाऊ भाव दया’ अशी घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे सभागृहाचे कामकाज 10 मिनिटासाठी कामकाज सभापतींनी तहकुब केले.

दरम्यान कामकाज तहकुब करण्यापूर्वी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा गंभीर विषय असल्यामुळे 289 प्रस्तावावर 93 ची चर्चा मंगळवारी किंवा बुधवारी घेण्याचे जाहीर केले.

Web Title: NCP leader Dhananjay Munde talked about Milk Agitation and farmers