'KissDay'वर धनंजय मुंडेंनी केले ट्विट

Dhananjay Munde
Dhananjay Munde

मुंबई : तरुणाईकडून साजरा करण्यात येत असलेल्या डे वरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.

आज (बुधवार) सगळीकडे 'KissDay'साजरा होत असताना धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. स्वतःचे सरण रचून आत्महत्या करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. गुन्हेगारी फोफावत चालली आहे. महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. मोदींनी गेल्या साडे चार वर्षात सर्व सामान्य जनतेचा पार 'कीस' काढलाय. #KissDay #ModiGoBack.

तरुणाईचे नेते म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ते कायम ट्विट करत असतात. आता त्यांनी तरुणाईकडून साजऱ्या होत असलेल्या डे वरून सरकारवर टीका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com