धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

मुख्यमंत्री महोदय तुमच्या यात्रेला शुभेच्छा! जमल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना, कर्जमाफीच्या नावावर फसवणूक केलेल्या शेतकऱ्यांना, उद्ध्वस्त झालेला कष्टकऱ्यांना, बेरोजगारीने पिचलेल्या तरुणांना भेट द्या.

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला सुरवात होत असून, या यात्रेला शुभेच्छा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी समस्या जाणून घ्या आणि तेथेच यात्रा थांबवा असे म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की मुख्यमंत्री महोदय तुमच्या यात्रेला शुभेच्छा! जमल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना, कर्जमाफीच्या नावावर फसवणूक केलेल्या शेतकऱ्यांना, उद्ध्वस्त झालेला कष्टकऱ्यांना, बेरोजगारीने पिचलेल्या तरुणांना भेट द्या. तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही!

पाच वर्षांत केलेली लोककल्याणकारी व विकासाची कामे जनतेपर्यंत पोचवून त्यांचा आदेश व आशीर्वाद घेण्याकरिता मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आजपासून प्रारंभ होत आहे. मोझरी येथून या यात्रेस प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी ट्विट करत यात्रेवर टीका केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Dhananjay Munde wish to CM Devendra Fadnavis Mahajanadesh Yatra