Pankaja Munde: 'पंकजा मुंडे भाजपमध्ये अस्वस्थ', एकनाथ खडसे आज घेणार पंकजा मुंडेंची भेट

आज एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांची भेट घेण्याआधी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली
Pankaja Munde
Pankaja MundeEsakal

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. अनेक नेत्यांच्या नाराजी, मतभेद, मनभेद दिसून येत आहेत. अशातच भाजपच्या कायम चर्चेत असणाऱ्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशातच पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. त्यानंतर पंकजा यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात रंगली. त्यावर आता अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

अशातच राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आज एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत. या भेटीआधी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे बोलताना म्हणाले की, 'पंकजा मुंडे यांचं वक्तव्य दुःखद आणि वेदनादायी आहे, गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी पक्षासाठी उभं आयुष्य घातलं. पंकजा मुंडे यांची अशी अस्वस्थता असणं म्हणजे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाजप पक्ष वर्षांवर्ष ज्यांनी वाढवला. बहुजनांपर्यंत पोहोचला. अशा जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये छळ होत आहे, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

Pankaja Munde
Odisha Train Accident: केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे रेल्वे अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, मृतांची संख्या 233 तर...

दरम्यान एकनाथ खडसे आज पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान एकनाथ खडसे-पंकजा मुंडे भेटीत राजकीय चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Pankaja Munde
Odisha Train Accident : मृत्यूचं तांडव! ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 233, तर 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com