पवार साहेबच देशपातळीवर यूपीए आणखी बळकट करतील: जयंत पाटील

रविवार, 10 जून 2018

पुणे : पंतप्रधानपदाबाबत शरद पवार साहेबांनी अनेकवेळा स्पष्ट केले आहे, कमी खासदारांच्या संख्येने पंतप्रधानपदावर दावा करणे शक्य नाही. पवार साहेबांसारख्या नेतृत्वामुळे अनेक पक्ष देशपातळीवर एकत्र येऊ शकतात. यूपीएसह एनडीएतील अनेक पक्षांशीही ते बोलू शकतात. राजकारणात काय होईल, हे कधी सांगता येत नाही. भविष्यात यूपीए आणखी बळकट होईल असे मला वाटते. त्यात पवार साहेबांचे नेतृ्त्व महत्त्वाचे असणार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले, की महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलनाला प्रचंड मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन नक्की होणार हे निश्चित आहे. आम्ही बुथनिहाय काम करण्याचे ठरविले आहे. विदर्भात त्यावेळी लाट होती. हल्लाबोलच्या माध्यमातून आम्ही विदर्भात गेलो आता राष्ट्रवादीकडे समर्थ पर्याय म्हणून लोक पाहत आहेत. शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व आमच्याकडे आहे. रोहित शर्मासारख्या जास्तीत जास्त धावा करण्याचा सल्ला अजित पवार यांनी मला दिला आहे. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकत्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल आम्हाला वाटतय. लोकांना आवश्यक ते उमेदवार देणे याकडे लक्ष आहे. प्रत्येक मतदारसंघात आमचे काम सुरु आहे. 

कोरेगाव-भीमा दंगलीमागे सरकारी पक्षाची भूमिका मोलाची होती. दोन समाज एकत्र येईपर्यंत सरकार गप्प कसे बसते. महाराष्ट्रात समाजात तेढ निर्माण झाली पाहिजे, यांचे हे कार्य आहे. या प्रकरणाचा तपास करावा, असे आमचे मत आहे. संभाजी भिडे हे राजकीय व्यक्तिमत्व नाही. त्यांनी समाजात तेढ निर्माण करणारी भाषा वापरली आहे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. केंद्र आणि राज्यातील सरकारवरील नागरिकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे धमकीचे एखादे पत्र व्हायरल झाले कसे. तुम्ही माध्यमांमध्ये जात असाल तर त्यामागील उद्देशाबाबत प्रश्न आहे. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारचा पाठिंबा काढून घेतला याचे मी समर्थन करतो. अशा समविचारी पक्षाशी आम्ही जुळवून आघाडी करणार आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले

Web Title: NCP leader Jayanat Patil criticized BJP and talked about NCP