Jayant Patil | "जोरात हाय गाडी"; चालकाकडून शिकून घेत जयंत पाटलांनी चालवली एसटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil
"जोरात हाय गाडी"; चालकाकडून शिकून घेत जयंत पाटलांनी चालवली एसटी

"जोरात हाय गाडी"; चालकाकडून शिकून घेत जयंत पाटलांनी चालवली एसटी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी इस्लामपुरात चक्क एसटी चालवलीय. इस्लामपूर आगारात जाऊन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. (Jayant patil Drives ST Bus)

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर एसटी आगाराला भेट दिली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून समस्याही जाणून घेतल्या. यानंतर जयंत पाटलांनी एसटीचा फेरफटकाही मारला. चालकासोबत संवाद साधत त्यांनी थेट एसटीच चालवली.

जयंत पाटलांचा एसटी चालवत असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चालकाकडून जयंत पाटलांनी एसटी कशी चालवायची हे शिकले, एसटीची सगळी यंत्रणाही जाणून घेतली. यावेळी उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणाही दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

Web Title: Ncp Leader Jayant Patil Drives St Bus In Islampur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jayant PatilNCPncp leader