जितेंद्र आव्हाडांचा बॅनर व्हायरल, शरद पवारांबाबत लिहिले...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

मंत्रीपदासाठी आव्हाड यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आला होता. तशी माहिती आव्हाड यांनीच दिली आहे. आव्हाड हे मंत्री होणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये विशेष उत्साह आहे.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा उद्या (सोमवार) विस्तार होणार असून, त्यापूर्वीच शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नावे व्हायरल होण्यास सुरवात झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांचा तर शरद पवार यांच्याविषयी मी तुमचा जन्मभर ऋणी राहील असे लिहिलेला बॅनर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंत्रीपदासाठी आव्हाड यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आला होता. तशी माहिती आव्हाड यांनीच दिली आहे. आव्हाड हे मंत्री होणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये विशेष उत्साह आहे. ठाण्यात जितेंद्र आव्हाड समर्थकांची बॅनरबाजी सुरू झाली असून 'एकनिष्ठच फळ ! मी जन्मभर तुमचा ऋणी राहील' असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Image may contain: 1 person, sky, car and outdoor

अजित पवार होणार उपमुख्यमंत्री?; बारामतीकरांना उत्सुकता

आव्हाड हे शरद पवार यांचे कडवे समर्थक म्हणून ओळखले जातात. राजकीय गुरू म्हणून ते नेहमीच शरद पवार यांचे नाव घेतात. एकवेळ राष्ट्रवादीवर टीका केली तर ते सहन करतील पण, शरद पवारसाहेबांवरील टीका त्यांना सहन होत नाही. तसा अनुभव भल्याभल्यांना आला आहे. पक्षाचे नेहमीच एकनिष्ठ राहिलेले जितेंद्र आव्हाड उद्या मंत्री होत आहेत. पवारसाहेबांमुळेच आपण मंत्री होत असल्याची भावना त्यांची आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Jitendra Awhad baner about Sharad Pawar for include in cabinet