esakal | शेलारजी, आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही: आव्हाड
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad

“नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही”, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यांच्या याच विधानावर भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली आहे.

शेलारजी, आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही: आव्हाड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या बापाचे राज्य आहे का, असे जाहीर निवेदन करणे आशिष शेलार यांना शोभत नाही. तसेच  आम्ही आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही, अशी जोरदार टीका राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

“नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही”, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यांच्या याच विधानावर भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली आहे. हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?, असा घणाघात शेलारांनी केला. यावरून आता त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. शिवसेना नेत्यांकडूनही शेलारांवर टीका होत आहे.

आशिष शेलार मुख्यमंत्र्यांना म्हणतात, 'तुझ्या बापाचं राज्य आहे का?'

आव्हाड यांनी ट्विट करत शेलारांना प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाड म्हणाले, की उद्धवच्या बापाचे राज्य आहे का? असे जाहीर निवेदन करणे आशिष शेलार यांना शोभत नाही. आणि होय मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही.