Narhari Zirwal: नरहरी झिरवळांनी लग्नसोहळ्यात ठरला ठेका! बायकोला घेतलं खांद्यावर अन् Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narhari Zirwal

Narhari Zirwal: नरहरी झिरवळांनी लग्नसोहळ्यात ठरला ठेका! बायकोला घेतलं खांद्यावर अन् Video Viral

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. झिरवळ हे त्यांच्या साधेपणामुळे, त्यांच्या बोलण्याच्या शैलीसाठी आणि साध्या राहणीमानामुळे परिचित आहेत.

नुकताच त्यांनी जपान दौरा केला तेव्हा त्यांची आणि त्यांच्या पत्नीच्या मराठमोळ्या पेहरावाची चर्चा झाली होती. आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये ते पत्नीला खांद्यावर घेऊन डान्स करताना दिसत आहेत. एका लग्नसोहळ्यावेळी त्यांनी डान्स केला आहे.

नरहरी झिरवाळ यांनी पत्नीला खांद्यावर घेत डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी संभळ या पारंपरिक वाद्यावर ठेका धरला आहे. सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या साधेपणाचीच सध्या चर्चा सुरू आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यात वनारे हे त्यांचे गाव असून ते आदिवासी बहुल भागातील आहेत.

काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवळ हे पत्नीसह जपान दौऱ्यावर होते. तेव्हा तयांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये झिरवळ यांनी पांढरा सदरा, धोतर, डोक्यावर गांधी टोपी, पायात चपला अशा पेहरावात ते होते. तर पत्नी नऊवारी साडी, कपाळाला कुंकू, गळ्यात पोत घालून होत्या. झिरवळ दाम्पत्याचे जपानमधल्या या फोटोंवर अनेक नेत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.

टॅग्स :narhari zirwaldance