नवाब मलिकांचं नवं ट्विट, वानखेडे 'दाऊद' की ‘ज्ञानदेव’ ?

nawab malik
nawab malikesakal

मुंबई : मुंबई ड्रग्स केसवरून (mumbai drugs case) मंत्री नवाब मलिक (nawab malik) आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यात वॉर सुरू आहे. दरम्यान नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या वैयक्तिक जीवनावरून गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडेंच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे (dawood wankhede) असल्याचा दावा नवाब मलिक यांनी काल केला होता. त्यानंतर समीर वानखेडेंच्या वडिलांनी हा दावा फेटाळला होता. मात्र आता नवाब मलिक यांनी दाऊद वानखेडेबाबत पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. आणखी एक ट्विट करत मोठा खुलासा केला आहे.

फेसबुकचा प्रोफाईल पिक्चर शेअर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला होता. मात्र, समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला होता. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी आणखी एक छायाचित्र ट्विट करुन वानखेडे आता चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका फेसबुकचा प्रोफाईल पिक्चर शेअर केला आहे. यामध्ये समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांचे छायाचित्र दिसत आहे. मात्र, या प्रोफाईलवर वानखेडे दाऊद असे नाव लिहले आहे. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे की दाऊद वानखेडे या संभ्रमात आणखीनच भार पडली आहे.

माझं नाव दाऊद पहिल्यापासूनही कधी नव्हतं-

दरम्यान ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या सर्व आरोपांचे खंडन केले होते. माझं नाव दाऊद पहिल्यापासूनही कधी नव्हतं. आताही नाही. जन्मल्यापासून माझं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे. शाळेत जाण्यापासून, कॉलेजला जाण्यापासून, एलएलबीला प्रवेश घेण्यापासून, डिपार्टमेंटला जाण्यापासून, रिटायर होण्यापासून माझं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. हे कुणीतरी गैरवापर करुन किंवा बनावट केलं असेल, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही किंवा माहितीही नाही, असे स्पष्टीकरण समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दिले होते

दाखल्यावर खोडखोड

समीर वानखेडेंच्या वडिलांनी धर्मांतर केलं. दोन मुलं जन्माला आली. त्यांचे जन्माचे दाखले आले आणि त्यांनतर वडिलांनी धर्मांतर लपून ठेवलं. नोकरी केली तिथे कोणताही पुरावा दिला नाही, असं मलिक यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसात धर्माच्या आड घेऊन प्रचार सुरू झाला होता. पण लोकांना माहीत नव्हतं हा व्यक्ती जन्मापासून आजपर्यंत मुस्लिम आहे. ते तपासात पुढे येईल, असंही मलिक म्हणाले. समीर वानखेडेच्या जन्माच्या दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद आहे. त्यांचा धर्म मुस्लिम आहे. त्या दाखल्यावर खोडखोड केलीय. हा दाखला खोटा असेल तर खरा दाखला कोणता आहे? त्यांनी समोर आणावा

nawab malik
जेल की बेल? आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

मी आणि माझे पती जन्मापासून हिंदू

वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर यांनी या धर्मांतराच्या आरोपावर उत्तर दिलं आहे. क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर त्यांच्या विवाहाचा फोटो पोस्ट करून कमेंट केली आहे. मी आणि माझे पती समीर जन्मापासून हिंदू आहोत. आम्ही कधीच धर्मांतर केले नाही. आम्ही सर्वच धर्माचा आदर करतो. समीरचे वडीलही हिंदू आहे. माझी सासू मुस्लिम होती. आता ती या जगात नाही. समीरचं पहिलं लग्न स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत झालं होतं, असंही क्रांतीने सांगितले.

nawab malik
फरार किरण गोसावीची अटक अटळ; पुणे पोलीस लखनऊला रवाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com