रामराजे 'घड्याळ' उतरविणार; भाजपकडे तीन मतदारसंघाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

... तीन विधानसभांची मागणी ...
रामराजे यांनी भाजपकडे तीन विधानसभा मतदार संघाची मागणी केल्याची माहिती आहे. यामधे कुलाबा हा मतदारसंघ त्यांचे जावई व राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार राहूल नार्वेकर यांच्यासाठी हवा आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे रथी महारथी नेते पक्षांतर करत असताना आता पक्षाचे दिग्गज नेते व शरद पवार यांचे विश्वासू रामराजे निंबाळकर यांनीही राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्धार केला आहे. रामराजे सध्या विधानपरिषद सभापती असून भाजपमधे प्रवेश केल्यास त्यांचे पद कायम राहू शकते अशी अटकळ बांधली जात आहे. 

रामराजे व खासदार उदयनराजे यांच्यात कमालीचे राजकिय वितुष्ट आहे. शरद पवार यांनी सतत दोघांमधे समझोता करण्याचा प्रयत्न केला तरी त्यामधे यश आलेले नाही. पणात उदयनराजे यांच्याच शब्दाला मान दिला जात असल्याने रामराजे कमालीचे नाराज आहेत. सातारा जिल्ह्यातील राजकारणातही उदयन राजे याचे वाढते प्रस्थ पाहून त्यांना शह देण्यासाठी भाजपने छत्रपतींच्या वारस घराण्यांनाच पक्षात घेण्याचे डावपेच रचले आहेत.

आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी भाजप प्रवेश करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना धक्का दिला आहे. अाता रामराजे यांनीही भाजपात जाण्याची सर्व तयारी केली असून या महिना अखेर त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचे सांगितले जाते. 

... तीन विधानसभांची मागणी ...
रामराजे यांनी भाजपकडे तीन विधानसभा मतदार संघाची मागणी केल्याची माहिती आहे. यामधे कुलाबा हा मतदारसंघ त्यांचे जावई व राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार राहूल नार्वेकर यांच्यासाठी हवा आहे. मात्र भाजपचे आमदार राज पुरोहित हे या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करत असल्याने तो सोडला जाण्याची शक्यता कमी आहे. या मतदारसंघात राहूल नार्वेकर यांचे बंधु व वहिणी भाजपचे नगरसेवक आहेत. कुलाब्याशिवाय फलटण या त्यांच्या मुळे मतदारसंघा बरोबरच वाई विधानसभा हा त्यांना स्वत:साठी हवा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ramraje Nimbalkar may be enteres BJP