तांबेचे रोहित पवारांकडून कौतुक तर सुजय विखेंना 'हा' अप्रत्यक्ष सल्ला

टीम-ई-सकाळ
Friday, 17 January 2020

घराणेशाही, महाविकास आघाडीचं सरकार, महाराष्ट्रापुढचे प्रश्न या सगळ्यांवर चर्चा सुरू होती. या चर्चेच्या दरम्यान रोहित पवार यांना एक प्रश्न विचारला गेला की, कुणाकडून अधिक अपेक्षा आहेत? सुजय विखे की सत्यजित तांबे?  या प्रश्नाला अत्यंत मिश्किल असे उत्तर रोहित यांनी दिले.

संगमनेर : नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे मेधा महोत्सव २०२० 'संवाद तरुणाई'शी हा कार्यक्रम चांगलाच रंगला. व्यासपीठावर धीरज देशमुख, आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील आणि रोहित पवार होते. घराणेशाही, महाविकास आघाडीचं सरकार, महाराष्ट्रापुढचे प्रश्न या सगळ्यांवर चर्चा सुरू होती. या चर्चेच्या दरम्यान रोहित पवार यांना एक प्रश्न विचारला गेला की, कुणाकडून अधिक अपेक्षा आहेत? सुजय विखे की सत्यजित तांबे?  या प्रश्नाला अत्यंत मिश्किल असे उत्तर रोहित यांनी दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रोहित पवार म्हणाले, 'दोघांकडूनही अनेक अपेक्षा आहेत. एका व्यक्तीकडून जे चांगलं काम चालू आहे. ते असेच पुढे काम केले पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि एका व्यक्तीला काही प्रमाणात स्वभाव बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले, त्यांनी हा सल्ला अप्रत्यक्षपणे भाजपचे खासदार आणि नेते सुजय विखे पाटील यांना दिला आहे. यावर काँग्रेसचे आमदार धिरज देशमुख यांनीही चांगलाच टोला लगावला. धिरज देशमुख म्हणाले की रोहित पवार यांचे उत्तर ऐकून मला अजय देवगणच्या फूल और कांटे या चित्रपटाची आठवण झाली. दोन बाईकवर एकटाच चालला आहे.

Video : तेव्हा सांगली बंदचे आवाहन केले असते तर बरे झाले असते : खा. कोल्हे

एका व्यक्तीला म्हणजे कोणाला असा प्रश्नही यावेळी निवेदन करणाऱ्या अवधूत गुप्ते यांनी अप्रत्यक्षपणे केला. यावर रोहित म्हणाले, आपण नगरमध्ये आहोत. नगर हे लिहताना कितीही सोपे वाटले तरी, नगर हे एवढं सोपं नाही लोकांना कळले आहे की मी काय आणि कोणाला उद्देशून बोललो आहे. यावेळी रोहित पवार यांना जवळचं काय कर्जत जामखेड की बारामती या प्रश्नावरही त्यांनी कर्जत जामखेड असे उत्तर दिले.

पुणे : डीएसकेमध्ये गुंतवणुक करणाऱ्या ठेवीदाराचे पैसे न मिळाल्याने आत्महत्या

तत्पूर्वी, याच कार्यक्रमात रोहित पवार यांनी कार्यक्रमाचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन लावला. फोनवर त्यांच्याशी बोलताना, रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यापुढं तरुणांच्या प्रश्नांची मालिका मांडली. संगमनेरमध्ये राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीने युवा आमदारांशी संवाद या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. अवधूत गुप्ते यांनी व्यासपीठावरील सगळ्यांना महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्यांची विकासकामांबाबतची भूमिका यावर प्रश्न केले आणि चर्चा केली. सर्व युवा नेत्यांनी अतिशय स्पष्टपणे प्रश्नांची उत्तरे दिलीत. अवधुत गुप्ते यांनी खुमासदार शैलीत त्यांना प्रश्न विचारले. त्यामुळं कार्यक्रमाची रंगत वाढत गेली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader rohit pawar statement on satyajeet tambe and sujay vikhe patil