भाजपने 'छत्रपती' उपाधीचा मान ठेवावा : रोहित पवार

Udyanraje Bhosale
Udyanraje Bhosale

पुणे : छत्रपती या उपाधीवर संपुर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधी मागे असणारा व्यक्ती नाही तर ती उपाधी मला महत्वाची वाटते. त्यामुळे भाजपने छत्रपती उपाधीचा मान ठेवावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी म्हटले आहे.

साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शनिवारी अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजप प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित होते. सुरवातीला हा प्रवेश मोदींच्या उपस्थितीत होणार असे बोलले जात होते. पण, प्रत्यक्षात तो अमित शहा यांच्या निवासस्थानी झाली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की उदयनराजे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणार होता, पण तो कार्यक्रम एका नेत्यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये केला जातो. मला एकचं सांगायच आहे, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे. कोणतंही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो तसाचं आपणही तो मान ठेवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com