'चंद्रकांत पाटील महिला आमदाराला डावलून आलेत, त्यांच्याकडून कसली अपेक्षा?'

Rupali Patil Thombre vs Chandrakant Patil
Rupali Patil Thombre vs Chandrakant Patilesakal
Summary

रुपाली पाटील-ठोंबरे यांनी ट्विटव्दारे भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.

पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) सरचिटणीस म्हणून कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यास भाजपच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. आप्पा जाधव असं मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी भाजपच्या (BJP) माथाडी सेलच्या माजी अध्यक्षासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया विश्रामबाग पोलीस ठाण्यात सुरुय. यामुळं राष्ट्रवादी आणि भाजपच्या तणावात पुन्हा एकदा वाढ होणार असल्याचं दिसू लागलंय. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी ट्विटव्दारे संताप व्यक्त केलाय.

ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे, दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली होती, त्यावरून आता वाद निर्माण झालाय. याप्रकरणी रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombre) यांनीह ट्विटव्दारे भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. भाजपचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) जे महिला आमदाराला डावलून आले, त्यांच्याकडून कसली आली अपेक्षा संस्काराची? भाजप पुरुष पदाधिकारी महिलांना मारहाण करतात आणि भाजपचे अध्यक्ष चार्ली चापलीन आहेत. त्यामुळं महिला खासदारांना मसनात पाठवण्याची भाषा करतात सत्तापिपासू, बेताल, वंगाळ भाजप नेते आहेत, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी चंद्रकांत पाटलांसह भाजप नेत्यांवर केलाय.

Rupali Patil Thombre vs Chandrakant Patil
'लोक पक्षात येत-जात असतात'; सिब्बलांच्या काँग्रेस सोडण्यावर काय म्हणाले वेणुगोपाल?

आज पुणे शहर राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यास भाजपच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. आप्पा जाधव असं मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. अप्पा जाधव यांचं नारायण पेठेत हॉटेल मुरलीधरजवळ जनसंपर्क कार्यालय आहे. बुधवारी सायंकाळच्या वेळेत जाधव हे त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत कार्यालयामध्ये बसले होते. त्यावेळी भाजपच्या माथाडी सेलचे माजी अध्यक्ष संतोष कांबळे हे त्याच्या 15 ते 20 साथीदारांसह जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आले. त्याने जाधव यांना त्यांच्या कार्यालयातच मारहाण केली. कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोडही केलीय. त्यानंतर सर्वजण दुचाकीवरुन पसार झाले. जाधव यांना मारहाणीत दुखापत झालीय. भाजपच्या या मारहाणीचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com