पवारांची साथ सोडण्याचे दुःख पण ठाकरेंचे स्वप्न हाती : अहिर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

आदित्य ठाकरेंच्या कामामुळे प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत आहे. एकीकडे दुःखही वाटतय आणि आनंदही होतोय. काहीवेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडण्याचे दुःख आहे. पण, उद्धव ठाकरेंचे स्वप्न हाती घेतल्याचा आनंद असल्याचे सांगत सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आज सकाळी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेनेने राष्ट्रवादीला दिलेला हा सर्वांत मोठा दणका असून राजधानी मुंबईत राष्ट्रवादीचे निवडणूकांच्या अगोदरच पानिपत झाल्याची चर्चा सुरू आहे. वरळी या स्वत:च्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली यामधे राष्ट्रवादीला अखेरचा रामराम करत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहिर केला. सचिन अहिर हे मुंबईतील राष्ट्रवादीचा चेहरा असून राज्यमंत्रीमंडळात ते राज्यमंत्री राहिलेले आहेत.

अहिर म्हणाले, की आदित्य ठाकरेंच्या कामामुळे प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत आहे. एकीकडे दुःखही वाटतय आणि आनंदही होतोय. काहीवेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Sachin Ahir statement on enters Shivsena