अन् संजयमामा शिंदे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

cm-devendra
cm-devendra

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे संजयमामा शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विशेष म्हणजे संजय शिंदे यांच्यासोबत त्यांचे बंधू माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे देखील उपस्थित होते. शिंदे बंधूंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने सध्याचे पक्षबदलाचे वातावरण पाहता राष्ट्रवादीत अस्वस्थता निर्माण झाली असून, राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा संजय शिंदे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षांना त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. अनेक विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आता कोणत्याही नेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली की पक्षांतराच्या चर्चांना उधाण येत आहे. 

त्यातच शिंदे बंधु जोडीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. नुकतीच राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणारे संजयमामा भाजपमध्ये तर जाणार नाही, ना असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे.

दरम्यान, सांगली आणि कोल्हापूर येथील पुरग्रस्तांसाठी शिंदे बंधु यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत सुपूर्द केली. त्यासाठीचा धनादेश दोघांनी मुख्यमंत्र्यांना सोपविले. त्यासाठीच या दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. संजयमामा यांनी पुरग्रस्तांसाठी ११ लाखांचा धनादेश दिला. तर विठ्ठलराव शिंदे कॉर्पोरेटीव्ह शुगर फॅक्ट्री यांच्या वतीने १० लाख ४ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. परंतु, शिंदे बंधुंनी केलेल्या मदतीपेक्षा त्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com