पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादीबाबत द्वेष- तटकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

थेट नगराध्यक्ष निवडण्याचा आणि प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा सरकारचा निर्णय राजकीय हेतुने घेण्यात आला.

पुणे - पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादीबाबत द्वेष आहे. त्यांना काय वाटते यावर राष्ट्रवादीची धोरणे ठरत नाहीत. त्यांनी आम्हाला मोफत सल्ले देऊ नयेत, अशी टीका  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी केली.

तटकरे म्हणाले, ''इंदू मिल आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांची अनास्था होती. फेब्रुवारीमध्ये 10 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. याविषीय उद्या (बुधवार) शरद पवार पुण्यात बैठक घेणार आहेत. तीन सत्रात ही बैठक होणार आहे. समविचारी पक्षांशी आघाडीचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात येतील. राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करणे हा प्रासंगिक करार असल्याचा शब्द काँग्रेसने वापरला. मला प्रासंगिक करार म्हणजे समजले नाही. माझी करमणूक झाली. आघाडी प्रासंगिक नसावी किमान 5 वर्षे असावी.'' 

कोकणातील पक्ष सोडून जाणाऱ्या कोणाचाही टीकेचा रोख माझ्यावर नाही. आम्ही चांगले यश मिळवले आहे. स्थानिक पातळीवर काही झाले असेल म्हणून पक्ष सोडत असतील. विकासाच्या कार्यक्रमात राजकारण नको, ही आमची भूमिका आहे. थेट नगराध्यक्ष निवडण्याचा आणि प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा सरकारचा निर्णय राजकीय हेतुने घेण्यात आला आहे, अशी टीका तटकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली.

Web Title: NCP leader Sunil Tatkare criticize Prithviraj Chavan