राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्री पदाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठं विधान; म्हणाल्या...

काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी राज्याचा आगामी मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असेल असे विधान केले होते.
Supriya Sule
Supriya Sule esakal

चंद्रपूर : काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज्याचा आगामी मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा (NCP) असेल असे विधान केले होते. या दोन्ही नेत्यांच्या विधानानंतर विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले असतानाच, पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले आहे. राज्याला कधी महिला मुख्यमंत्री पाहण्यास मिळेल या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे यांनी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. (Supria Sule On NCP Chief Minister)

Supriya Sule
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का? दिलीप वळसे पाटील स्पष्टच बोलले

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी पदासाठी कोणतेही काम करत नसल्याचे सांगत, आगामी निवडणुकीत मला पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदार संघातून तिकिट द्यावे, अशी मागणी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर, 2024 ची लोकसभा निवडणूक बारामती येथूनच लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पदासाठी आपण इच्छुक नसून, मी पदासाठी कोणतेही काम करत नाही.

Supriya Sule
राष्ट्रवादी सोबत शपथ घेताना भाजपने हिंदुत्वाचा विचार कुठे ठेवलेला?

धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले पटोले?

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) असेल असे विधान केले होते. त्यावर काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले होते की, प्रत्येकाने आस ठेवली पाहिजे, लोकशाहीत पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. काहींना दिवसाही स्वप्न पडतात, यावर काही बोलणार नसल्याचे पटोले यांनी म्हटले होते. त्यानंतर आज स्वतः सुळे यांनीच स्पष्टीकरण दिल्याने आगामी काळातील राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com