पवार कुटुंबात उभी फूट; सुप्रिया सुळेंचे डोळे पाणावले

टीम ई-सकाळ
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे सोशल मीडियावर काय सक्रीय असतात. आज सकाळी त्यांनी व्हॉट्सअप स्टेट ठेवलंय ते लक्षवेधी ठरतंय.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं जाहीर केलंय. सगळ्यात धक्कादायक म्हणजे, त्यांनी पक्षाबरोबर पवार कुटुंबात फूट पडल्याचं म्हटलंय. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचं अधिकृत स्टेटमेंट आल्यानंतरच मी बोलेन, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलीय.

ताज्या बातम्यांसाठी सकाळचे एप डाऊनलोड करा 

No photo description available.

काय म्हणतायत सुप्रिया सुळे?
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे सोशल मीडियावर काय सक्रीय असतात. आज सकाळी त्यांनी व्हॉट्सअप स्टेट ठेवलंय ते लक्षवेधी ठरतंय.  Party and Family Split असं सूचक स्टेटस सुप्रिया सुळे यांनी ठेवलंय. त्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद असल्याचं उघड झालयं. कारण, भाजपच्या सोबतीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय हा, अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे शरद पवार यांनी ट्विट करून स्पष्ट केले होते. पण, त्यांनी कुटुंबात फूट पडल्याचं कोणतंही विधान केलेलं नव्हतं. त्याच वेळी सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस वरून, केवळ पक्षातच नव्हे तर, कुटुंबातही फूट पडल्याचं म्हटलंय.  

आणखी वाचा : पवार कुटुंबात कोण काय करतंय?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader supriya sule whatsapp status party and family split