Ban Indic tales : भुजबळ, अजित पवार अन् जयंत पाटील एकत्र उतरले रस्त्यावर, राष्ट्रवादी आक्रमक

राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ मुंबई पोलिस आयुक्तांना भेटणार आहे.
Ban Indic tales
Ban Indic tales

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एका कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवण्यात आल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाणाचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अजित पवार आणि जयंत पाटील एकत्र रस्त्यावर उतरले आहेत. (NCP leaders Ajit Pawar Jayant Patil Chhagan Bhujbal demands ban on Indic tales writing offensive articles about savitribai phule )

राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ मुंबई पोलिस आयुक्तांना भेटणार आहे. लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स' वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. तर आज अजित पवार आणि जयंत पाटील एकत्र रस्त्यावर उतरले आहेत.

Ban Indic tales
Sanjay Shirsat: 'त्या' प्रकरणी संजय शिरसाटांना पोलिसांकडून क्लिन चीट; नेमकं काय आहे प्रकरण?

भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे. 'इंडिक टेल्स' नामक मनुवादी वृत्तीच्या वेबसाइटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीचं लिखाण करण्यात आलेलं आहे. या लेखातील भाषा अतिशय अपमानजनक आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

पत्रात भुजबळ यांनी काय म्हटलं आहे?

स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड-धोंडे, शेणाचा मारा अंगावर झेलला. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले. अशा व्यक्तिमत्त्वावर आजही समाजातील दृष्ट प्रवृत्तींकडून प्रहार केला जात आहे, याबद्दल भुजबळ यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

Ban Indic tales
Ahilyabai Holkar Jayanti : त्याकाळात अहिल्यादेवींची तुलना इंग्लंड, डेन्मार्क, रशियाच्या महाराणींसोबत केली जायची..

एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा सावित्रीबाई फुलेंवर चिखलफेक करीत आहे. या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरू आहे. ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे.

त्यामुळं सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय सरकारनं गांभीर्यानं घेऊन आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या 'इंडिक टेल्स' वेबसाइटवर बंदी आणावी आणि सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाइट आणि लेखकावर कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी भुजबळ यांनी पत्राद्वारे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com