राष्ट्रवादीला आणखी एक धक्का! भास्कर जाधवांच्या हाती धनुष्यबाण...

ncp MLA Bhaskar Jadhav resigns
ncp MLA Bhaskar Jadhav resigns

औरंगाबाद:  राष्ट्रवादी काँग्रेसचे  माजी मंत्री गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार  भास्कर जाधव  यांनी शुक्रवारी (ता.13) औरंगाबाद गाठत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे याच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला आहे. 

भास्कर जाधव शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर ,अनिल परब यांच्यासह यांनी विशेष विमानेने औरंगाबादेत आले होते. माजी खासदार चंद्रकांत खैरे, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थित कुंभेफळ जवळ विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेत राजीनामा दिला.

 विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज भास्कर जाधव यांना अधिक वेळ लागू नये म्हणून विशेष काळजी घेतली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे एका कार्यक्रमाला जाणार होते. तत्पूर्वीच जालना रोडवरील कुंभेफळमध्ये एका ठिकाणी भास्कर जाधव येऊन थांबले होते. हरिभाऊ बागडे यांना उशीर झाला होता. मात्र हरिभाऊ बागडे यांनी थेट मोटरसायकलवर बसूनच भास्कर जाधव जिथे वाट पाहत थांबले होते तिथे ते पोहोचले.

राजीनामा दिल्यानंतर भास्कर जाधव ,नार्वेकर, परब यांच्यासमवेत विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झाले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भास्कर जाधव आज दुपारी शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com