राष्ट्रवादीचा आमदार चढला झाडावर; मिळवून दिला महिलांना न्याय

झाडावर चढून आत्महत्या करणे पर्याय नाही, मी स्वतः याप्रकरणी लक्ष देईल - क्षीरसागर
Sandeep Kshirsagar
Sandeep Kshirsagarटिम ई सकाळ

बीड : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी थेट झाडावर चढत आंदोलक महिलांशी चर्चा केल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे बीडमध्ये सर्वत्र त्यांच्याच चर्चा रंगल्याचे दिसून आले. महिला कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामगार म्हणून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी बीड नगरपरिषदेच्या काही कंत्राटी महिला कामगार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज उपोषणाला बसल्या होत्या.

Sandeep Kshirsagar
RRB Protest | गोळीबारानंतर ट्रेन जाळली... बिहारमध्ये रेल्वे भरतीचा वाद पेटला

बीड नगरपालिकेत महिला कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामगार म्हणून घेत नसल्याने दोन महिला कामगारांनी कंटाळून झाडावर चढत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या. अशात बीडचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना त्या आंदोलक महिला झाडावर चढल्याचे दिसल्या. हे पाहून धनंजय मुंडेनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. या वेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागरही आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते. आमदार क्षीरसागर यांनी महिलांसोबत चर्चा करण्यासाठी थेट स्वतः झाडावर चढले आणि महिला कर्मचाऱ्यांना झाडावरून खाली येण्यासाठी विनंती केली.

Sandeep Kshirsagar
दादा कुठं मधेच घुसले? संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

"मी लोकप्रतिनिधी या नात्याने आपले प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर आहे. झाडावर चढून आत्महत्या करणे पर्याय नाही, मी स्वतः याप्रकरणी लक्ष देईल, असा शब्द क्षीरसागर यांनी महिला कर्मचाऱ्यांना दिला. आमदार क्षीरसागर यांचे आश्वासन ऐकून दोनही महिला कर्मचारी झाडावरुन खाली उतरल्या आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

Dhananjay Munde
Dhananjay Mundeटिम ई सकाळ

यानंतर धनंजय मुंडे यांनीही महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या. सोबतच लवकरच यावर तोडगा काढणार, असे आश्वासन सुध्दा दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com