अजुनही वेळ गेलेली नाही; आव्हाडांचे राहुल गांधीना भावनिक आवाहन

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 18 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भावनिक आवाहन केले आहे. काँग्रेसला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. तुम्ही नेतृत्त्व करा, सोडून जाऊ नका. अजूनही वेळ गेली नाही,  गेली 75 दिवस मी अस्वस्थ होतो. आपण दिलेल्या राजीनाम्यावर पुनर्विचार करावा, असेही या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आव्हाड यांनी म्हटले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भावनिक आवाहन केले आहे. काँग्रेसला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. तुम्ही नेतृत्त्व करा, सोडून जाऊ नका. अजूनही वेळ गेली नाही,  गेली 75 दिवस मी अस्वस्थ होतो. आपण दिलेल्या राजीनाम्यावर पुनर्विचार करावा, असेही या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, सोनिया गांधी वयोमान आणि प्रकृतीच्या कुरबुरी असूनही काँग्रेसचा सुवर्णकाळ परत आणू शकतील, यात तीळमात्र शंका नाही. मात्र, आपण एक संवेदनशील नेते आहात. सध्या उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला तुम्ही चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकता.

माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात सुमारे 35 वर्षांपूर्वी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून झाली. आज मी महाराष्ट्रातील विधानसभेचा सदस्य आहे. आधीच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मी राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली. या प्रवासात अनेक चढ-उतार येऊनही लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांवरील माझा विश्वास अढळ राहिला, ती कॉंग्रेसची सुवर्ण भेट मानतो, असे आव्हाडांनी सांगितले आहे.

हा क्रौर्य तसंच विकासाचा मुखवटा पांघरलेली प्रवृत्ती आणि लोकांची खरी काळजी यामधील लढा आहे. त्यामुळे तुम्हाला कठीण काळात नेतृत्त्वाची परीक्षा पास करावीच लागेल. तुमच्या राजीनाम्यामुळे, आणि त्यावर पुनर्विचार करण्यास नकार दिल्यामुळे काँग्रेसवर ओढवलेलं संकट पाहून माझ्यासह अनेकांना त्रास होत असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

आ. जितेंद्र आव्हाड यांनी लिहलेले मूळ पत्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp mla jitendra awhad appeals to rahul gandhi congress