आमदारांच्या सह्यांचा गैरवापर, शरद पवारच बोलतील : नवाब मलिक

Nawab Malik
Nawab Malik

मुंबई : आमदारांच्या उपस्थितीसाठी आमचे गटनेते अजित पवार यांनी आमदारांच्या घेतलेल्या सह्यांचा गैरवापर केला. अजित पवारांसोबत गेलेले आमदार शरद पवारांना भेटले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक म्हणतात, की अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाविषयी शरद पवार सर्वकाही बोलतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. 

राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पाठिशी नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजप अजित पवारांना घेऊन कसे बहुमत सिद्ध करणार हा प्रश्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com