राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार बेपत्ता; तक्रार दाखल

Nitin Pawar
Nitin Pawar

नाशिक : महाराष्ट्रातील सत्तानाट्याच्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवणचे आमदार नितीन पवार बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या मुलाकडून दाखल करण्यात आली आहे. नितीन पवार हे अजित पवारांंसोबत शपथविधीला राजभवनात हजर होते.

अजित पवार यांच्यासोबत राजभवनात शपथविधीला गेलेल्या 12 आमदारांपैकी काही आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतले आहेत. फक्त तीन आमदार बेपत्ता असून, यामध्ये नितीन पवार यांचेही नाव आहे. यामुळे त्यांचा मुलाकडून नितीन पवार बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पंचवटी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, यावेळी त्यांची पत्नी जयश्री पवार उपस्थित होत्या.

अजित पवार यांना पाठिंबा दिलेल्या आमदारांपैकी काही आमदार आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्वगृही परतले. मात्र, जे आमदार अजूनही नॉट रिचेबल आहेत, त्यांच्यापैकी एका आमदाराच्या मुलाने ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस स्टेशनला दाखल केली आहे. सत्तासंघर्षाच्या नाटकात एक नवीन वळण मिळाले असून शहापूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दौलत दरोडा यांच्यासोबत संपर्क होत नसल्याचे त्यांचा मुलगा करण दरोडा यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आमदार दौलत दरोडा हे मतदारसंघातून बेपत्ता झाल्याची तक्रार शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com