संभाजी भिडे यांच्या वेशात आमदार अवतरले विधानभवनात

बुधवार, 4 जुलै 2018

गजभिये यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. यावेळी त्यांनी भिडेंना अटक करा, असे फलक झळकाविले. गजभिये यांच्यासोबत यावेळी जोगेंद्र कवाडेही उपस्थित होते. एका टोपलीतून भिडेंचे आंबे म्हणून ते आंबे घेऊन आले होते.

नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या आज (बुधवार) पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये हे शिवप्रतिष्ठाणचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या वेशात विधानभवनात अवतरले. 

सरकार भिडेंना अटक करत नाही याचा निषेध म्हणून गजभिये यांनी हे अनोखे आंदोलन करत सरकारवर टीका केली. भिमा कोरेगाव प्रकरणात दलितांवर अन्याय करण्यामागे भिडेंचा सहभाग असतानाही सरकार गप्प असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

गजभिये यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. यावेळी त्यांनी भिडेंना अटक करा, असे फलक झळकाविले. गजभिये यांच्यासोबत यावेळी जोगेंद्र कवाडेही उपस्थित होते. एका टोपलीतून भिडेंचे आंबे म्हणून ते आंबे घेऊन आले होते.

Web Title: NCP MLA Prakash Gajbhiye demands Sambhaji Bhide arrest