राष्ट्रवादीत मोठे नाराजीनाट्य; 'हा' आमदार उद्याच देणार राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

राजकारणाचा किळस आला, त्यामुळे आता बाजूला व्हायचे ठरविले आहे. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगाव मतदार संघातील आमदार प्रकाश सोळंके म्हणाले. 

बीड : राजकारणाचा किळस आला, त्यामुळे आता बाजूला व्हायचे ठरविले आहे. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगाव मतदार संघातील आमदार प्रकाश सोळंके म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंत्रीमंडळ विस्तानंतर आमदार सोळंके नाराज असल्याच्या पोस्ट सोशल मिडीयावर फिरत असल्याने प्रस्तुत बातमीदाराने त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगीतले. आपण चुकीचे होतो म्हणून यात पडल्याचेही श्री. सोळंके यांनी सांगीतले. 

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणतात, 'गांभीर्यपूर्वक...

दरम्यान, प्रकाश सोळंके चौथ्या वेळा आमदार आहेत. पंचायत समितीचे सभापती ते राज्यमंत्री अशी त्यांची राजकीय वाटचाल राहीलेली आहे. दिवंगत लोकनेते सुंदरराव सोळंके यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या प्रकाश सोळंके यांनी सगल तीन वेळा विजयी होण्याचा माजलगाव मतदार संघात विक्रम केलेला आहे. 

शरद पवारांचे धक्कातंत्र; 'या' विश्वासू नेत्याला दिले गृहमंत्री पद?

दिवंगत सोळंके राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते. या मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा कोणीही विजयी झालेले नसताना श्री. सोळंके मात्र सलग तीन वेळा विजयी झाले. मागच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी महसूल, भूकंप व पुनर्वसन, पणन, सहकार अशा महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून काम केले. यावेळीही त्यांनी विजय मिळविला.

पुणे : शिवाजीनगरऐवजी आता 'या' ठिकाणावरून सुटणार एसटी

जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विजयी झालेल्यांमध्ये चौथ्यांदा विजयी झालेले केवळ प्रकाश सोळंके आहेत. इतर धनंजय मुंडे, बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर हे प्रथमच विधानसभेत आहेत. सिनिॲरीटीमुळे प्रकाश सोळंके यांना मंत्रीपद मिळेल अशी त्यांच्या समर्थकांना खात्री होती. मात्र, धनंजय मुंडे यांना मंत्रीपद दिल्यानंतर सोळंके नाराज झाले. त्यांनी थेट राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

Image result for NCP Prakash Solanke"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Prakash Solanke may resign Tomorrow