मंत्रालयात पाऊल ठेवणाऱ्या पंकजा मुंडेंना विचारला जाब

Pankaja Munde
Pankaja Munde

मुंबई : धनगर आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही, असे म्हणणाऱ्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आज (मंगळवार) मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रालयात येताच त्यांना राष्ट्रवादीच्या आमदारांकडून रोखण्यात आले.

पंकजा मुंडे यांनी नुकतेच एका सभेत साठ वर्षे सत्तेत राहणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. आरक्षणाबाबत भाजप सरकार अनुकूल भूमिका घेत आहे. धनगर आरक्षणाचा विषय मार्गी लागणार नाही, तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही, प्रसंगी सरकारवर काठी उगारायलाही मागे हटणार नाही, असे आश्वासन दिले होते.

या आश्वासनानंतर दोन दिवसांत पंकजा मुंडे मंत्रालयात हजर झाल्या. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी त्यांना रोखले आणि धनगर आरक्षण कधी देणार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com